मुख्यपृष्ठ / प्रश्नोत्तरे
जन्मपत्रिका, मुहूर्त, सल्ला आणि धार्मिक विधींविषयी भाविकांच्या मनातील सर्व शंकांचे निरसन
अचूक जन्मपत्रिका मांडणीसाठी व्यक्तीची जन्मतारीख (Date of Birth), जन्मवेळ (Time of Birth - सकाळ/दुपार/रात्र) आणि जन्मस्थान (गाव/तालुका/जिल्हा) आवश्यक असते.
होय. भाविकांची गर्दी आणि धार्मिक विधींचे पूर्वनियोजन लक्षात घेता, कार्यालयात येण्यापूर्वी कृपया फोन किंवा व्हॉट्सॲपवर संपर्क साधून आपली वेळ निश्चित करावी.
होय, नक्कीच! वास्तुशांती, गृहप्रवेश, सत्यनारायण महापूजा, नवग्रह शांती व नवचंडी यज्ञ हे सर्व विधी आपल्या घरी, नवीन वास्तूत अथवा कार्यालयात येऊन शास्त्रोक्त पद्धतीने पार पाडले जातात.
वास्तुशांती, नवग्रह शांती, उदक शांती, नक्षत्र शांती, कालसर्प योग शांती, नवचंडी यज्ञ, श्री सत्यनारायण पूजा, विवाह विधी, मुंज विधी आणि गरजेनुसार सर्व शास्त्रोक्त वैदिक अनुष्ठान केले जातात.
विधी निश्चित झाल्यानंतर आवश्यक असणाऱ्या संपूर्ण पूजा साहित्याची सविस्तर यादी आम्ही आधीच उपलब्ध करून देतो. आवश्यकतेनुसार पूजा साहित्याची व्यवस्था करण्यासही सहकार्य केले जाते.
होय. वधू-वरांचे ३६ गुणमेलन, मंगळ दोष विचार, नाडीदोष, गणदोष आणि वैवाहिक जीवनाच्या सुखासाठी आवश्यक ग्रहस्थितीचा सखोल अभ्यास करून निःपक्षपाती मार्गदर्शन केले जाते.
होय, जे भाविक कार्यालयात प्रत्यक्ष येऊ शकत नाहीत, ते आपली जन्म माहिती व्हॉट्सॲपवर पाठवून फोनवर सविस्तर ज्योतिष सल्ला आणि शंकांचे निरसन करून घेऊ शकतात.
कार्यालय सकाळी ९:०० ते रात्री ८:३० या वेळेत आठवड्याचे सर्व दिवस सुरू असते. तरीही येण्यापूर्वी फोन करणे सोयीचे ठरेल.
आपल्या मनात शंका आहे?
कोणत्याही पूजेच्या मुहूर्ताबाबत, विधीबद्दल किंवा ज्योतिष सल्ल्यासाठी थेट कॉल किंवा व्हॉट्सॲप करा.